Maharashtra Rain : राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग, कोकणात मुसळधार पाऊसाची शक्यता
राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग घोंघावतायतत.... मराठवाडा ते तामिळनाडूपर्यंत ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यानं कोकण पट्ट्यात मुसळधार पाऊस सुरु आहे... रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरात अवकाळी पाऊस झालाय... पुढचे तीन ते चार दिवस पाऊस असाच सुरु राहिल अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केलीेए... सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली, दोडामार्ग परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे... सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे... तिकडे कोल्हापूर जिल्ह्यातही रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या.... दिवसभर उकाड्यानं हैराण झालेले कोल्हापूरकर पावसाच्या सरीनं सुखावले,..