Maharashtra Rain : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा, बळीराजा संकटात
abp majha web team
Updated at:
06 Mar 2023 09:24 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात अवकाळी पावसाचं संकट उभं राहिलंय... बुलढाणा, पालघर, नाशिक, संभाजीनगर आणि रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस बरसलाय.... विजांच्या गडगडाटासह पाऊस कोसळतोय... बुलढाण्यात अवकाळी पावसामुळे गहू हरभरा, कांदा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे... तिक़डे नाशिकमध्येही पावसाच्या सरी बरसल्या.,..
कांदा, गहू, हरभरा, आंबा, द्राक्षासह भाजीपाल्याला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे... पालघरमध्ये काही भागात झालेल्या पावसामुळे शेतकरी, बागायतदार यांच्यात चिंतेचं वातावरण आहे... शेतमालाला भाव मिळत नसल्याने आधीच हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवं संकट उभं ठाकलंय...