Maharashtra Unlock : मंदिरं, रेस्टॉरंट, मॉल्स उघडण्याबाबत आज निर्णयाची शक्यता ABP Majha

Continues below advertisement

मुंबई : काल मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधून सर्वसामान्यांना लोकल सुरु करण्यासह अनेक महत्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं. मात्रं प्रार्थनास्थळं, रेस्टॉरंट, मॉल्स उघडण्याबाबत अद्याप काही निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. आज यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे रात्री 8.30 वाजता कोविड टास्क फोर्ससोबत बैठक करणार आहेत. या बैठकीनंतर यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. हॉटेल्सला देखील रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी मिळावी यासंदर्भात आजच्या टास्क फोर्सच्या बैठकीत भूमिका मांडणार असल्याचं मंत्री अस्लम शेख यांनी म्हटलं आहे. 

टास्कफोर्सच्या बैठकीनंतर निर्णय
मुख्यमंत्री काल म्हणाले होते की, रेस्टॉरंट, मॉल, प्रार्थनास्थळे याबाबत  टास्कफोर्सशी चर्चा करून  निर्णय घेऊ. महाराष्ट्रातील जनतेने राज्य शासनाला आतापर्यंत सहकार्य केले म्हणूनच मुंबई मॉडेलचे, महाराष्ट्राचे कौतूक जगभर झाले. याचे सर्व  श्रेय माझे नसून राज्यातील जनतेचे  असल्याचेही ते म्हणाले होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram