Sangli Unlock : सांगलीत उद्यापासून निर्बंध शिथिल होणार; काय सुरु, काय बंद? ABP Majha
पुणे आणि सोलापूरनंतर आता सांगलीमध्येही निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. सांगली जिल्ह्यात उद्यापासून कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात येणार आहे. सांगलीतील दुकानं, मॉल, उपहारगृहं, सलून-स्पा रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलीय.