Maharashtra Unlock : पुणे,सांगली,सोलापुरातील निर्बंध आजपासून शिथिल; पुणे, सांगलीत काय सुरु, काय बंद?
पुणे, सांगली, सोलापुरातील निर्बंध आजपासून शिथिल, पुण्यात मॉल, दुकानं संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. तर हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.
दुसरीकडे कोविड पॉझिटिव्हिटी रेटनुसार सांगली जिल्हा तिसऱ्या स्तरात गेला आहे. त्यामुळे आजपासून जिल्ह्यात निर्बंधांमध्ये आणखी शिथिलता देण्यात येत आहे. सांगली जिल्ह्याचा मागील आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट 11 टक्के इतका होता. आठवडाभरात पॉझिटिव्हिटी दरात घट झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
Tags :
Maharashtra Unlock Coronavirus In Maharashtra Pune Unlock Sangli Unlock Lockdown Restrictions