Maharashtra Unlock : कोरोनामुळे दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा सुरू करण्याबाबत पालकांची मागणी
कोरोनामुळे दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा सुरू करण्याबाबत पालकांकडून मागणी होत आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्रही देण्यात आले आहे.
दरम्यान,राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असताना कोरोनाचे निर्बंध शिथिल होणार का याचा आज झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज महत्वाची बैठक झाली असून राज्यातील 25 जिल्ह्यांमधील लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
राज्यात लागू असलेल्या निर्बंधामध्ये काही शिथिलता आणली पाहिजे यासाठी आम्ही अहवाल सादर केला आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले की, राज्याचे अर्थचक्र चाललं पाहिजे यासाठी शिथिलता गरजेची आहे. काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची आकडेवारी कमी आहे. 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालये सुरु करता येतील पण एसीचा वापर नसावा. दुसरीकडे रेस्टॉरंट, सलून पार्लर हळूहळू जास्त संख्येने सुरु करता येतील. शनिवार आणि रविवार पैकी आता शनिवारी संध्याकाळी सर्व व्यवहार सुरु ठेवता येऊ शकेल.