Maharashtra Unlock : राज्यभरात हॉटेल्स, रेस्टॉरंट, मॉल्स 15 ऑगस्टपासून रात्री 10 पर्यंत सुरू

#MaharashtraUnlock #MaharashtraUnlockGuidelines #ABPMajha मुंबई : राज्यभरात हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स सुरू करण्यासंदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. हॉटेलला रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी मिळणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.15 ऑगस्ट नंतर याची अंमलबजावणी होणार आहे. मात्र मॉलमधील रेस्टॉरंट आणि थिएटर्स मात्र बंद राहणार असल्याची माहिती आहे. तसेच ज्यांचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत त्यांना मॉलमध्ये प्रवेश राहणार असल्याचं देखील कळतंय. सध्या रेल्वे पास साठी जो क्यू आर कोड वापरला जातोय तोच मॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि इतर ठिकाणी वापरला जाण्याची शक्यता देखील आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola