2018 मध्ये राज्यांचे अधिकार काढले नसते तर मराठा आरक्षण टिकलंही असतं : खासदार Supriya Sule Exclusive

2018 मध्ये राज्यांचे अधिकार काढून घेतले नसते तर मराठा आरक्षण कदाचित टिकलंही असतं, असं म्हणत एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना तांत्रिक गोष्टी लक्षात आल्या नव्हत्या का, तेव्हाच ही दुरुस्ती का नाही केली? असा सवाल सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. लोकसभेतल्या चर्चेत नारायण राणे का नाही बोलले? भाजपची नियत साफ असती तर त्यांनी राणे यांना बोलू द्यायला पाहिजे होतं, राणे साहेब समितीचे अध्यक्ष होते सभागृहातल्या चर्चेची सुरुवातच त्यांनी करायला पाहिजे होती, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola