Maharashtra Unlock : व्यापाऱ्यांचा ठाकरे सरकाकडून पुन्हा भ्रमनिरास; कोल्हापूरचे व्यापारी म्हणतात...
दुकानांच्या वेळेबाबत निर्बंध शिथिल करण्यात येतील, तसंच सर्वसामान्यांना, किमान लस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळेल अशी आशा संपूर्ण महाराष्ट्राला होती.. मात्र कालच्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. तिसऱ्या लाटेच्या शक्यतेकडे बोट दाखवत राज्य सरकारनं निर्बध जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेतलाय.. त्यामुळं व्यापारी वर्ग आक्रमक झालाय. लवकरच दुकान सुरु ठेवण्याची वेळ सरकारनं वाढवली नाही तर आम्हीच तो निर्णय घेऊ असा आक्रमक पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतलेला दिसतोय.. तर दुसरीकडे लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी मिळावी म्हणून भाजप आंदोलन करणार आहे..