महाराष्ट्रात साखर संग्रहालय उभारणार?साखर कारखानदारी मलिन होत असल्याने उद्या महत्त्वाचा निर्णय होणार?
राज्यातील साखर कारखानदारी बदनाम होत असताना राज्य सरकार उद्याच्या मंत्रिमंडळात घेणार महत्त्वाचा निर्णय, महाराष्ट्रातील साखर उद्योगामुळे राज्याचा झालेला विकास दाखवण्यासाठी साखर संग्रहालय उभारणार, गेल्या अनेक वर्षांपासून देशात साखर उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर होता, मात्र गेल्या तीन ते चार वर्षांपासून उत्तर प्रदेशने साखर निर्मितीमध्ये महाराष्ट्राला पिछाडीवर टाकल आहे, याच अनुषंगाने मागच्या आठवड्यात साखरेचे उत्पादन वाढवण्यासाठी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समितीही गठीत केली आहे, सध्या भाजपकडून साखर कारखानदारी वरती टीका होताना पाहायला मिळते तर अनेक भ्रष्टाचाराची आरोप ही केले जात आहेत, त्यामुळे राज्यातील सहकारी साखर कारखान्यांनी महाराष्ट्राचा किती विकास केला याची माहिती देण्यासाठी साखर संग्रहालय उभारल जाणार, उद्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत होणार निर्णय