Maharashtra Temple Reopen : Shirdi मध्ये पुन्हा ऐकू येणार साईनामाचा जयघोष ABP Majha

घटनस्थापनेच्या मुहूर्तावर म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी 7 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे मंदिरावर उपजीविका करणाऱ्या छोट्या व्यवसायिकांना आनंदाचे भरते आले आङे. देव नाही तर सरकार पावले अशी म्हणण्याची वेळ यांच्यावर आलीय कारण विस्कटलेली आर्थिक घडी सुधारेल असा विश्वास त्यांना वाटतोय. 

राज्य सरकारने घटस्थापनेपासुन मंदिरं खुली करण्याचा निर्णय घेतल्यानंतर साईभक्त शिर्डी ग्रामस्थ आणि व्यवसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसुन येतय... साई मंदिरावर शिर्डीच अर्थकारण अवलंबून असून धार्मिक स्थळे उघडल्यानं शिर्डीच्या अर्थकारणाची चाके फिरण्यास मदत होईल हे मात्र नक्की.
 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola