Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 PM : 2 सप्टेंबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 PM : 2 सप्टेंबर 2024 : ABP Majha 

नवी मुंबईमध्ये नियमांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची हजारो घरे बिल्डरांकडून हडप करण्याचा प्रकार समोर आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा प्रकार महानगरपालिका अधिकाऱ्यांना हताशी धरून करण्यात आल्यामुळे राज्य सरकार सामान्य नागरिकांचे की धनदांडग्यां बिल्डरांचे असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.  

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कायद्यातून फायदा कसा मिळवायचा याचं एक उत्तम उदाहरण समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार करताना सर्वसामान्यांची तब्बल 11 विकासकांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या मदतीने 791 घरे लाटल्याचं समोर आलं आहे. यासाठी त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्यातील अधिकाऱ्यांची देखील मदत झाली आहे.     

शहरांमधील जमिनींचे भाव गगनाला भिडले असल्याने आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न घटकांना घरे घेणे अशक्यप्राय आहे. त्यामुळे राज्य शासनाने 2013 साली एक अधिसूचना प्रसिद्ध केली आणि त्यामध्ये 10 लाख लोकसंख्या असलेल्या महानगरपालिका क्षेत्रात आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी घरे बांधण्याचे बंधनकारक केले. जर एखाद्या विकासकाने 4 हजार चौ.मी क्षेत्र महानगरपालिकेकडून विकत घेतले असेल तर त्यातील 20 टक्के क्षेत्रावर आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी घरे बांधून ती म्हाडाकडे हस्तांतरीत करावीत असं देखील सांगण्यात आलं होतं. त्यानुसार काही बिल्डरांनी म्हाडाकडे घरे हस्तांतरित देखील केली. मात्र नवी मुंबईतील 11 विकासक असे आहेत त्यांनी सर्वसामान्यांना घरे दिलीच नाहीत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram