Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 04 PM : 28 May 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 04 PM : 28 May 2024
मॉन्सून भारतात दाखल. भारतीय हवामान विभागाची घोषणा. केरळ आणि उत्तर-पूर्व भारतात मॉन्सूनचं एकाचवेळी आगमन.
मान्सून १५ जूनपर्यंत महाराष्ट्र व्यापण्याचा अंदाज, १० जूनला पाऊस मुंबईत दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज.
यंदा सरासरीपेक्षा 106 टक्क्यांहून अधिक पाऊस पडणार,हवामान विभागाचा अंदाज.
मुंबईमध्ये नालेसफाईतील हलगर्जीप्रकरणी कंत्राटदारांवर कारवाई, कंत्राटदारांना ५४ लाख ६८ हजार रुपयांचा दंड, महापालिकेची कारवाई.
वसईच्या वर्सोवा ब्रिजवळ सूर्या पाईपलाइनच्या खोदकामावेळी मातीचा मलबा खचला, जेसीबीसह ऑफिस कंटेनर मातीच्या मलब्याखाली अडकल्याची माहिती, कंटेनरमधील ५ ते ७ जणांना बाहेर काढण्यात यश.
मुंबईत आजपासून पाच टक्के पाणीकपात, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांनी गाठला तळ, तर पाच जूननंतर 10 टक्के पाणी कपात करण्यात येणार.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांनी तळ गाठल्यानं, पाणी जपून वापरण्याचं महापालिकेचं आवाहन.