Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 15 August 2024

Continues below advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, सलग अकराव्यांदा मोदींकडून देशाला संबोधन. 

पंतप्रधानांचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून स्वागत, तर लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींना भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय वायुदलाकडून गार्ड ऑफ ऑनर. 

पंतप्रधानांनी ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांवर वायूसेनेच्या लढाऊ हेलिकॉप्टर द्वारा पुष्पवृष्टी, स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी सुमारे सहा हजार निमंत्रित उपस्थित.  

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना अभिवादन, अभिवादन करत केलं पुष्पअर्पण. 

'सिव्हील कोडच्या गंभीर विषयावर देशभरात चर्चा व्हावी', देशात एकच सेक्युलर सिव्हील कोड असावं, पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावरुन अपेक्षा व्यक्त 

'बांगलादेशात लवकरच स्थिती सुधारेल अशी अपेक्षा',  बांगलादेशात हिंदू, अल्पसंख्य सुरक्षित राहावे, लालकिल्ल्यावरून पंतप्रधान मोदींकडून बांगलादेश समस्येचा उल्लेख

 देशातील 140 कोटी लोकांनी संकल्प केला तर २०४७ पर्यंत आपण भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचं लक्ष्य पूर्ण करू शकतो, आपण भारताला समृद्ध करू शकतो, पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन 

अगोदर दहशतवादी हल्ला करून अनेकांना मारायचे, आता देशाची सेना एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक करते, पंतप्रधानांकडून विश्वास व्यक्त. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram