Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 09 Jan 2025 : ABP Majha

Continues below advertisement

टोरेस घोटाळ्यात भाजी विक्रेता प्रदीपकुमारचे तब्बल 14 कोटी रूपये बुडाले, जवळपास ३ लाख मुंबईकरांचे कोट्यवधी रुपये टोरेस कंपनीने बुडवले.

आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून टोरेस कंपनीचा पंचनामा, टोरेस कार्यालयातील लॉकरमध्ये ५ ते ६ कोटी रोख अजूनही असल्याची सूत्रांची माहिती, दादर कार्यालयाशी संबधित ३ बँक खाती पोलिसांकडून जप्त.

टोरेस कंपनीचा घोटाळा १ हजार कोटींचा असण्याची शक्यता, शिवाजी पार्क, नवी मुंबई पोलिसांना 2024 मध्येच घोटाळ्याची शंका आल्याची माहिती, कंपनीचा माजी सीईओ तौसिफ रियाजने घोटाळ्यासंबंधीची कागदपत्र पोलिसांना दिली.

टोरेस घोटाळा प्रकऱणातील आरोपींचा जुना व्हिडीओ समोर, व्हिडीओमध्ये दोन महिला पैसे घेऊन पळून जात असल्याचं समोर. 

टोरेस कंपनीने केलेल्या फसवणुकीनंतर शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर तक्रारदारांची गर्दी, तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्याबाहेर स्वतंत्र टेबल.

वांद्रेच्या भारतनगरमध्ये एसआरएविरोधात ठाकरे गटाचं आंदोलन, आमदार वरुण सरदेसाई देखील आंदोलनात सहभागी, कोर्टाकडून स्थगिती असतानाही एसआरएकडून घरं पाडण्याची नोटीस देण्यात आल्याची रहिवाश्यांची माहिती. 

एचएमपीव्हीवर नियंत्रण आणि उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाकडून टास्क फोर्स गठीत, जे.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पल्लवी सापळे टास्क फोर्सच्या अध्यक्ष. 

सागरी सुरक्षा आणि अवैध मासेमारीची आता ड्रोनच्या माध्यमातून निगराणी होणार, राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे खात्याचे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ड्रोन यंत्रणेचं उद्घाटन. 

नागपूर, पुणे, मुंबईसाठी स्लीपर वंदे भारत सुरू करण्याची मागणी, त्यासाठीचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडून रेल्वे बोर्डाकडे सादर. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram