Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 23 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 23 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात अजूनही जागा वाटपाचा तिढा कायम, अद्याप 3 ते 4 जागांवर तिढा, लवकरच तिढा सुटेल, त्यानंतर पत्रकार परिषद होणार अशी माहिती. 
अजितदादांच्या राष्ट्रवादीची ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, महायुतीत अजित पवारांसोबत गेलेल्यांना पहिल्या यादीत स्थान. 
राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत नवाब मलिक, त्यांच्या कन्या सना मलिक, आणि पोर्श कार प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या सुनील टींगरेंचं नाव नाही. 
बारामतीतून अजित पवार निवडणूक लढणार यावर शिक्कामोर्तब, मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार कोण हे अद्याप अस्पष्ट.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारांना एबी फॉर्म देण्यास सुरुवात, बारामतीच्या जागेसाठी मात्र अद्याप  कुणालाही एबी फॉर्म नाही.
संध्याकाळपर्यंत ठाकरे गटाची पहिली यादी येणार, जागावाटप ९९ टक्के पूर्ण, घोषणेची केवळ औपचारिकता, संजय राऊतांची प्रतिक्रिया, 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram