Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 02 June 2024
ABP Majha Headlines : 02 PM : 02 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
एक्झिट पोल नव्हे, हे मोदी मीडिया पोल, काँग्रेसच्या पराभवाच्या भाकितांमुळे राहुल गांधींची आगपाखड, तर इंडियाच्या २९५ जागा येणार, राहुल गांधींचा दावा
एक्झिट पोलनंतर सांगलीच्या जागेवरून मविआमध्ये पुन्हा वाद... विशाल पाटलांच्या विजयाच्या अंदाजानंतर राऊतांचा आक्रमक पवित्रा... तर नाना पटोलेंचा राऊतांवर पलटवार
महायुतीमध्ये जास्त घटकपक्षांना घेतल्यामुळे अधिक फटका बसला, बच्चू कडू यांनी साधला निशाणा
पक्षांच्या आदेशामुळेच निवडणूक लढलो... पराभव झाला तरी खचणार नाही ... विजय झाला तरी माजणार नाही, एक्सिट पोलनंतर सुधीर मुनगंटीवारांची सावध प्रतिक्रिया
बीड लोकसभा निवडणूक वनसाईड झाली असून आपण १०० टक्के निवडून येणार.... मविआचे उमेदवार बजरंग सोनावणेंचा दावा.
लोकसभेच्या निकालानंतर भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता...राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष तर राज्य पातळीवरही भाजपमध्ये फेरबदलाची शक्यता