Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 08PM : 21 May 2024

Continues below advertisement

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या पुण्यातील हायप्रोफाईल अपघातावर वेगवान घडामोडी घडत आहेत. हे प्रकरण पुणे पोलीस (Pune) आयुक्तांनी गंभीरतेने घेतल्याचं सांगत याप्रकरणी पबचालक व आरोपी वेंदात अग्रवालचे वडिल विशाल अग्रवाल यांना अटक केली आहे. त्यातच, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज अचानकपणे पुणे पोलीस आयुक्तालयात धाव घेतली. यावेळी, पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन संबंधित प्रकरणाची माहिती घेतली. तसेच, याप्रकरणी कुठलीही हयगय किंवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यानंतर, स्वत: गृहमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन घटनेची माहिती देत, याप्रकरणी कोणालाही सोडलं जाणार नाही, पोलीस पुन्हा वरच्या कोर्टात जातील, असे फडणवीसांनी म्हटले. यावेळी, दिल्लीतील निर्भया हत्याकांडाचा संदर्भही फडणवीसांनी दिला. 

पुण्यातील कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघातप्रकरणी गृहविभाग अॅक्शन मोडवर आला आहे. थेट गृहमंत्र्यांनीच याप्रकरणाची गंभीर दखल घेत आज पुणे गाठले. त्यानंतर, पोलीस आयुक्तांशी संबंधित घटनेची व तपासाची सखोल चौकशी करुन पत्रकार परिषद घेत माहिती दिली. ''लोकांमध्ये या घटनेचा संताप व नाराजी आहे. मी पोलिसांसोबत याबाबत बैठक घेऊन सर्वच बाबतीत चर्चा केली. मुळातच ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत जो काही अहवाल ज्युवेनाईल जस्टीस बोर्डकडे दिला आहे. त्यामध्ये, 304 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 17 वर्षे 8 महिन्यांचा हा मुलगा असल्याने ज्युवेनाईल जस्टीस बोर्डाने आरोपीला जामीन मंजूर केला.  मात्र, निर्भया हत्याकांडनंतर बाल हक्क मंडळामध्ये जे बदल करण्यात आले आहेत, त्यानुसार 16 वर्षांपेक्षा अधिक वयाचा मुलगा असल्यास त्यास प्रौढ म्हणून ट्रीट केलं पाहिजे. त्यानुसार, पोलिसांनी बाल हक्क मंडळापुढे तसा अहवालही दिला होता. मात्र, ज्युवेनाईल जस्टीस बोर्डने तो आदेश सीन अँड साईटप्रमाणे बाजुला ठेवल्याने आरोपीस जामीन मिळाल्याचे फडणवीसांनी सांगितले.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram