Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 10 Jan ABP Majha

Continues below advertisement

सिडकोच्या घरांसाठी १ लाख ३४ हजार अर्ज, ऑनलाइन अर्ज नोंदणीची मुदत आज  संपल्यानंतरही संकेतस्थळावरील अर्ज नोंदणीचा पर्याय खुलाच ठेवण्याचा निर्णय, ग्राहकांना पसंतीचे घर घेण्याची आणखी एक संधी. 

बांगलादेशी रोहिंग्यांच्या जन्म दाखला प्रमाणपत्र घोटाळ्याचं प्रकरण, मालेगावनंतर आता अमरावतीसाठी समिती स्थापन.  

जागतिक सरासरी तापमानात मोठी वाढ, २०२४ वर्ष सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंद, २०२४ मधील सरासरी जागतिक तापमान १५.१० अंश सेल्सिअस 

आगामी काळात वातावरणीय बदलांमुळं गहू आणि भाताचं उत्पादन घटण्याची भीती, उत्पादनात घट आणि वाढती मागणी यामुळं गहू,तांदुळ महागेल, वेधशाळेचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी व्यक्त केली भीती 

वाहन खरेदीवर नियंत्रण आणण्याचा परिवहन विभागाचा विचार, जपानच्या धर्तीवर नवे पार्किंक धोरण राबवण्याचा विचार, विविध शासकीय संस्था, तज्ञांसोबत चर्चेनंतर प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात येणार. 

दिल्लीत होणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे, मात्र या त्याचं तिकीट जास्त असल्याने ते कमी करण्यात यावं अशी मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना विनंती. 

'कोल्डप्ले' संदर्भातील याचिका हायकोर्टानं फेटाळली, तिकीट विक्री प्रकरणात हायकोर्टानं हस्तक्षेप करण्याची गरज नाही, याचिकाकर्त्यांना योग्य त्या प्रशासकीय विभागाकडे दाद मागण्याची मुभा. 

आपण सर्व चंद्रपूर जिल्ह्याचे वाली, कुणीही सुग्रीव नाही, नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला. 

अकोल्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार, पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख, जिल्हा संघटक आणि उपजिल्हाप्रमुखांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram