Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 30 Sep 2024 : 09 PM : ABP Majha

Continues below advertisement


मराठा आरक्षणावरचा माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारण्यात आलाय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. 

शिंदे समितीचा अहवाल एबीपी माझाच्या हाती,   सापडलेल्या पुराव्यांची संख्या ५४ लाख ८१ हजार ४०० वर, सार्वजनिक दस्तावेजात कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबीचे पुरावे सापडले. 

मराठा उपसमितीच्या बैठकीला आरक्षणासाठी काम करणाऱ्या संघटनाही सहभागी होत्या, मराठा उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटलांची माहिती, मराठा आरक्षण कोर्टात टिकवू, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य.

समृद्धी महामार्गाचं लोकार्पण नव्या सरकारच्या काळात होण्याची शक्यता, मुंबई-नाशिक महामार्गावर आमणे इंटरचेंजजवळ रस्त्याचं काम अपूर्ण, अपूर्ण कामामुळे लोकार्पण लांबणीवर गेल्यांची माहिती.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युटीमध्ये मोठी वाढ , ग्रॅच्युटीची मर्यादा १४ लाखांवरुन २० लाखांवर , मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. 

शालेय विभागासाठी देखील राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, ४ हजार ८६० विशेष शिक्षकांच्या पदाला मान्यता

राज्यातील होमगार्डच्या भत्त्यात भरीव वाढ, ४० हजार होमगार्डना लाभ होणार, राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयातूून होमगार्डना दिलासा.

कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ,  अनुकंपा धोरणाही लागू,  ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा ८ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान मिळणार,  राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय.

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात ५ हजार, तर मदतनीसांच्या मानधनात ३ हजार रुपयांची वाढ, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, मंत्री आदिती तटकरेंची माहिती. 

 केंद्राच्या मिठागराच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गृहनिर्माण विभागाचा निर्णय़.

देशी गायींना "राज्यमाता- गोमाता" म्हणून घोषीत करण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता, देशी गाईंच्या पालन पोषणासाठी अनुदान योजनाही जाहीर, पशुसंवर्धन विभागाची माहिती.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram