Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 4 PM : 7 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

हर्षवर्धन पाटलांचा मुलगा आणि मुलीसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटलांनी तुतारी फुंकली. 

इंदापूरमधून हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी जाहीर,  स्वत शरद पवारांनी जाहीर केली उमेदवारी, इंदापूरचं शिवधनुष्य हर्षवर्धन पाटलांनीच हाती घ्यावं, आपल्याला त्यांना निवडून द्यायचंय. जयंत पाटील, शरद पवारांचं भाषणात वक्तव्य. 

अजित पवार शिरुर नव्हे तर बारामती विधानसभेतूनच लढणार, राष्ट्रवादीतल्या सूत्रांची एबीपी माझाला माहिती

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये बैठक,  बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती.

मेट्रो अॅक्वा लाइन ३ आजपासून मुंबईकरांच्या सेवेत. आरे जेव्हीएलआर ते बीकेसी प्रवासाला सुरुवात तर उद्यापासून नियमित सेवा 

मेट्रो 3 च्या दिवसभरात जवळपास 96 फेऱ्या होणार , बीकेसी, विद्यानगरी स्टेशन, सांताक्रुझ, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 1 सह 9 भूमिगत स्टेशन असणार. 

मेट्रो-३ मार्गिकेवरुन पहिली मेट्रो सकाळी ६.३० वाजता सुटेल तर, शेवटची मेट्रो रात्री १०.३० वाजता सुटणार, प्रवाशांना तिकीटासाठी 10 ते ५० रुपये मोजावे लागणार. 

पश्चिम रेल्वेवरील सहाव्या रेल्वे मार्गिकेचं कांदिवलीपर्यंतचं काम पूर्ण, त्यामुळे पश्चिम रेल्वेवर लोकलच्या फेऱ्यांची संख्या वाढणार. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram