Maharashtra SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा | मुंबई सुपरफास्ट | ABP Majha | 3 PM

Continues below advertisement

Maharashtra SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा | मुंबई सुपरफास्ट | ABP Majha | 3 PM

राज्यात आजपासून पोलीस भरतीला सुरुवात, १७ हजार जागांसाठी १७ लाख अर्ज, ४० टक्के उमेदवार गरजेपेक्षा उच्चशिक्षित. 

आरटीई प्रवेशांबाबत माहिती देण्यास शाळांची टाळाटाळ, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती, प्रशासनाला योग्य ती माहिती सादर करण्याचे शाळांना हायकोर्टाकडून निर्देश

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या पुन्हा ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय, दुर्गम भागात सेवा देणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षकांना मिळणार न्याय.

रेशनकार्ड-आधारकार्ड लिंक करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत,  याआधी 30 जूनपर्यंत मुदत होती

एलआयसी मेट्रो शहरातील मालमत्ता विकणार असल्याची चर्चा, या मालमत्ता विक्रीतून सहा ते सात अब्ज डॉलर उभे करण्याची एलआयसीची योजना, मात्र एलआयसीने फेटाळली शक्यता

पुढचे काही दिवस मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अंदाज.

राज्यात यंदा पावसाच्या हंगामात सरासरीपेक्षा तीन मिमी जास्त पाऊस,  राज्यात या काळात सरासरी १०२ मिमी पाऊस पडतो, मात्र यंदा प्रत्यक्षात १०५.८ मिमी पाऊस पडलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram