Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 28 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 28 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
भाजपची तिसरी यादी जाहीर, २५ उमेदवारांच्या नावांची घोषणा, हरीश पिंपळे, सई डहाके, राजेश वानखडे यांच्यासह इतरांना संधी. 
बीडच्या आष्टी मतदारसंघात भाजपकडून सुरेश धस यांना संधी, मविआकडून शरद पवार पक्षाचे मेहबूब शेख निवडणूक लढवणार. 
बीडच्या आष्टी मतदारसंघात भाजपाचे माजी आमदार सुरेश धस यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, मोठं शक्तीप्रदर्शन करत विधानसभा निवडणुकीत दंड थोपटले. 
माळशिरस विधानसभेसाठी भाजपकडून पुन्हा राम सातपुतेंना संधी, सातपुतेंविरोधात मविआच्या उत्तम जानकरांचं आव्हान.
ठाण्यात एकनाथ शिंदेंचं शक्तिप्रदर्शन,  अर्ज भरण्याआधी मुख्यमंत्र्यांकडून आनंद दिघेंना अभिवादन. 
अजित पवारांनी बारामतीतून लाडकी बहीण लाभार्थींच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज, , अर्ज दाखल करण्यापूर्वी अजित पवारांनी शक्तिप्रदर्शन करत काढली रॅली. 
बारामतीत युगेंद्र पवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल, अर्ज भरण्याआधी युगेंद्र पवारांंचं कुटुंबीयांकडून औक्षण, त्यानंतर कन्हेरी हनुमान मंदिरात जाऊन युगेंद्र पवारांनी घेतलं दर्शन. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram