Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : ABP Majha : 28 Dec 2024

Continues below advertisement

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार, काँग्रेस मुख्यालयापासून अंत्ययात्रेला सुरुवात. 

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, लष्कराकडून मनमोहन सिंग यांना मानवंदना. 

मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधण्यास सरकार बांधील, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं स्पष्टीकरण, गृहमंत्री अमित शाह यांनी मल्लिकार्जुन खरगेंना फोन करुन दिली ग्वाही 

अंजली दमानियांनी घेतली सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट, जोपर्यंत न्याय मिळतं नाही तोपर्यंत इथंच राहणार, अंजली दमानियांचं वक्तव्य. 

संतोष देशमुखांसाठी बीडमध्ये आज विराट मोर्चा, देशमुखांना न्याय मिळावा यासाठी अनेक नेते मोर्चात सहभागी होणार, यात बजरंग सोनवणे, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, छत्रपती संभाजी राजे भोसले आणि मनोज जरांगेंसह अनेक नेत्यांचा सहभाग. 

बीडमधील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सज्ज, शहरातील चौकचौकात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त 

 बीडमधील मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मस्साजोग गाव बंद. गावातील सर्व दुकानं आणि आस्थापना बंद.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram