Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 24 ऑक्टोबर 2024 : 4 PM ABP Majha

Continues below advertisement

Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 24 ऑक्टोबर 2024 : 4 PM ABP Majha
भाजपची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता,  भाजपच्या दुसऱ्या यादीत नेमकी कोणाला संधी मिळणार याकडं लक्ष. 
विधानसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात ८ सभा, ७ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान मोदींच्या सभांचा धडाका, फक्त भाजपच नाही तर महायुतीच्या उमेदवारांचाही करणार प्रचार. 
दिल्लीतल्या बैठकीत महायुतीच्या फॉर्म्युल्यावर होणार शिक्कामोर्तब, लोकसभेप्रमाणे यावेळीही भाजपचा जास्त जागांचा अट्टाहास असल्याची सूत्रांची माहिती, अखेरच्या तीस जागांसाठी महायुतीची अजूनही रस्सीखेच सुरूच. 
दोन षटकार मारले तर शिवसेनेची सेन्चुरी पूर्ण होईल, जागावाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, शेवटच्या क्षणी काही ठिकाणी अदलाबदल होऊ शकते, राऊतांचं स्पष्टीकरण 
मविआत ८५-८५-८५ हा अंतिम फार्मुला नाही तर तात्पुरता, काँग्रेस १००हून अधिक जागा लढणार, उद्या काँग्रेस स्क्रीनिंग कमिटीच्या बैठकीत नावं फायनल होणार, सूत्रांची माहिती
काँग्रेसची ५२ ते ५४ उमेदवारांची पहिली यादी आज संध्याकाळपर्यंत येणार, उर्वरीत जागा उद्या संध्याकाळी चर्चेनंतर जाहीर करणार, विजय वडेट्टीवारांची माहिती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram