Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 19 May 2024

Continues below advertisement

कुटुंबप्रमुख म्हणून सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात कधीच भेदभाव केला नाही, सत्तेत असताना अजित पवारांना अनेक मंत्रिपदं दिली, तरी पक्षात मला काम करण्यास संधी मिळाली नाही ही अजित पवारांची ओरड निरर्थक, शरद पवारांनी अजित पवारांना सुनावलंय. 

२००४ पासूनच प्रफुल्ल पटेल भाजपबरोबर जाण्यासाठी आग्रही होते, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं वक्तव्य.  

प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया सुरू झाल्यावर जनमानस विरोधात जात असल्याची जाणीव भाजपला झाली, त्यामुळेच मोदींनी विखारी, धार्मिक, वैयक्तिक पातळीवर प्रचार आणि हल्ले सुरू केले, मोदींच्या नकली संतान आणि भटकती आत्मा वक्तव्यावरुन शरद पवारांचा निशाणा. 

राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते भाजपबरोबर गेले असले तरी सामान्य कार्यकर्ते मूळ पक्षाबरोबरच, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचा दावा. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram