Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
राज्यात यंदा १ ते २४ जून दरम्यान सरासरीपेक्षा पाच टक्के जास्त पाऊस, दुष्काळी समजल्या जाणाऱ्या सोलापूर आणि लातूरमध्ये आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची नोंद.
राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात आज मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज.
महाविकास आघाडी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय विधानसभा लढणार, विश्वसनीय सुत्रांची माहिती, मुख्यमंत्रीपदाबाबत निकालानंतर निर्णय घेणार असल्याचीही माहिती.
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस मुस्लिम उमेदवार देणार असल्याची शक्यता, वजाहत मिर्झा, मुझफ्फर हुसेन, नसीम खान यांची नावे आघाडीवर, 5 जुलै अर्ज भरण्याची शेवटची तारीख.
नीट, यूजीसीच्य़ा घोटाळ्यांनंतर यूपीएससीची कडक नियमावली, यूपीएससी वापरणार एआय आधारित सिस्टीम, गैरप्रकार रोखण्यासाठी यूपीएससीची तयारी, नवीन सात अटी लागू.
राज्य सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून आमंत्रित केलेल्या चहापानावर बहिष्कार.