Maharashtra SuperFast : महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा : सुपरफास्ट बातम्या : 22 June 2024

Continues below advertisement

Maharashtra SuperFast : महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा : सुपरफास्ट बातम्या :  22 June 2024

जालन्याच्या वडीगोद्रीत सरकारच्या १२ जणांच्या शिष्टमंडळानं घेतली ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची भेट, चर्चेनंतर हाके आणि वाघमारेंचं आंदोलन स्थगित, मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरुच ठेवण्याचा निर्धार. 

आंदोलन आम्ही स्थगित केलं, थांबवलेलं नाही, हाकेंचं स्पष्टीकरण, सरकारकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा, ओबीसींच्या मागण्यांबाबत सरकार काठावर पास, हाकेंचं वक्तव्य. 

हाकेंना पुन्हा उपोषण करण्याची वेळ सरकारने आणू नये, पंकजा मुंडेंचं वक्तव्य, मराठा भांडण लावण्याचं कारस्थान मी केलं नाही, पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण. 

सरकार मराठ्यांना फसवतंय, सग्यासोयऱ्याची अंमलबजावणी झाली नाही म्हणून मराठ्यांना न्याय मिळाला नाही, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा. 

भुजबळ मराठे आणि सरकारला वेठीस धरतायत, भुजबळच हाकेंना काय बोलायचं हे सांगतात, जरांगेंचा आरोप.

जात जनगणनेला देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा, वडीगोद्री इथं बोलताना छगन भुजबळांची माहिती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram