Maharashtra Superfast : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर : 18 July 2024 : 8 PM

Continues below advertisement

वर्षा बंगल्यावर शिवसेनेची बैठक संपन्न, विधानसभेच्या निवडणुकीत 100 जागा लढण्याची तयारी, त्यासाठी 100 विधानसभा निरीक्षकांची नियुक्तीचे आदेश.

ठाकरे गट मुंबईतील ३६ पैकी किमान २५ जागा लढवण्याच्या तयारीत, मुंबईतील बहुतांश मतदारसंघावर ठाकरे गट आग्रही,  वांद्रे पूर्वमधून वरून सरदेसाई तर दहिसरमधून तेजस्वी घोसाळकर यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता

शरद पवार नटसम्राट, छगन भुजबळ फिरत्या रंगमंचावरचे मोठे कलाकार, संजय राऊतांची प्रतिक्रिया. 

सरकारने १५०० रुपयांत महिलांची बोळवण केली, मतदानासाठी 1500 रुपये देत आहात का? यशोमती ठाकूूर यांचा सवाल उपस्थित करत टीका.

वाघनखांचं स्वागत मुंबईपासून साताऱ्यापर्यंत करायला हवं होतं,  सरकारनं भाड्याने वाघनखं आणली, ती वाघनखं मिळवलेली नाहीत.  वाघनखांवरुन जयंत पाटलांची प्रतिक्रिया, 

वाघनखं शिवरायांची नाहीत, काही इतिहासकारांचा दावा, वाघनखांबाबात जाणकरांचं मत लक्षात घेणं गरजेचं, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं विधान.

भिवंडीमध्ये मेट्रो हॉटेल ते माडा कॉलनी काँक्रेट रस्त्याचे भूमिपूजन, १८ कोटी काँक्रीटीकरणाचा खर्च,  वाहतूक सुरळीत होऊन अपघाताच्या प्रमाणात घट होईल, आमदार महेश चौघूलेंची माहिती.

बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा पुणे ते मुंबई भर पावसात लाँग मार्च. सात दिवस होऊनही सरकारने दखल घेतली नाही, मार्च नवी मुंबईतील बेलापूर शहरात दाखल. 

भिवंडीत ठाकरे गटाकडून काश्मीर येथील दहशतवादी  हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने. भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात केली निदर्शने. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram