Maharashtra SuperFast : महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा : 23 June 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Maharashtra SuperFast : महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा :  23 June 2024 :  ABP Majha

१ नोव्हेंबर २००५ नंतर नोकरीला लागलेल्या  शिक्षकांना पेन्शन देणार, तर आदिवासी आश्रमशाळांची वेळ पूर्वीप्रमाणे ११ ते ५ करणार. जळगावमधील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. 

बाकीच्या आरक्षणाची संसदेत चर्चा होते,  मात्र महाराष्ट्रातील आरक्षणावर चर्चा का होत नाही, सुप्रिया सुळेंचा सवाल. 

जरांगेंच्या नेतृत्वात मराठा समाजाकडून विधानसभेच्या 100 जागांची चाचपणी, मागील 10 वर्षात मराठा आमदार निवडून आलेल्या मतदारसंघांना प्राधान्य

रेल्वेचं प्लॅटफॉर्म तिकीट स्वस्त होणार, जीएसटी परिषदेत रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकिटासह अन्य सेवांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतल्याचा परिणाम. 

रिक्षाचालकांचं उद्या राज्यभर आंदोलन, वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास विलंब शुल्क आकारण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन. 

दिवाळीनंतर पहिल्या टप्प्यात एसटीच्या ताफ्यात नव्या दोनशे गाड्या दाखल होणार, एसटीच्या स्वमालकीच्या एकूण 2 हजार 400 गाड्या खरेदी करणाच्या महामंडळाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मंजुरी.


Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram