Maharashtra Superfast : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर : 18 July 2024 : ABP Majha

Continues below advertisement

दिड हजारात काय होतंय?, लाडक्या बहिणींनाही १० हजार रूपये द्या, खासदार संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला 

सरकारने १५०० रुपयांत महिलांची बोळवण केली, मतदानासाठी 1500 रुपये देत आहात का? यशोमती ठाकूूर यांचा सवाल उपस्थित करत टीका.

वाघनखांचं स्वागत मुंबईपासून साताऱ्यापर्यंत करायला हवं होतं,  सरकारनं भाड्याने वाघनखं आणली, ती वाघनखं मिळवलेली नाहीत.  वाघनखांवरुन जयंत पाटलांची प्रतिक्रिया, 

वाघनखं शिवरायांची नाहीत, काही इतिहासकारांचा दावा, वाघनखांबाबात जाणकरांचं मत लक्षात घेणं गरजेचं, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं विधान.

विरोधी पक्षाचे नेते म्हणजे इतिहासकार नाही, त्यांचं पोट दुखणं स्वाभाविक, वडेट्टिवारांनी केलेल्या टिकेवरुन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर.

छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श घोटाळ्यात फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची जिल्हा उपनिबंधक सहकारी कार्यालयात धडक, आतापर्यंत प्रशासनाने काय केलं माजी खासदार इम्तियाज जलील यांचा अधिकाऱ्य़ांना सवाल. 

बार्शीचे आमदार राजेंद्र  राऊत मनोज  जरांगेंची भेट,  दोघांमध्ये बऱ्याच वेळ चर्चा, २० जुलैपासून जरांगेंचा आमरण उपोषणाचा इशारा.

डेंग्यूच्या प्रश्नावर काँगेस आणि ठाकरे गट आक्रमक, नाशिकमध्ये मनपा आयुक्तना काँगेस पदाधिकाऱ्यांना डेंग्यू डासाची प्रतिकृती भेट. 

नाशिक महापालिकेने छतावरील डासांचं उत्पत्ती स्थळ हटवलं, एबीपी माझाच्या बातमीनंतर महापालिकेला जाग, काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून साथ रोगांवर नियंत्रण आणण्याचे निवेदन. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram