Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 18 Sep 2024
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर एक देश एक निवडणूक विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडणार, काँग्रेससह इंडिया आघाडीतील अनेक पक्षांचा विरोध, राज्याच्या संमतीचंही केंद्रासमोर आव्हानमहायुतीतल्या वादाच्या जागांवर अमित शाह तोडगा काढणार असल्याची माहिती, सप्टेंबर अखेरीस जागावाटप पूर्ण करण्याचं टार्गेट, उद्या शिंदे, फडणवीस अजितदादांची बैठक
पक्षांतर्गत नाराजीबद्दल अजितदादांनी बोलावली सर्व आमदारांची बैठक, महामंडळ वाटपासंदर्भात अजितदादा आणि फडणवीस मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
मुंबईतल्या ३६ जागांवर महाविकास आघाडीची खलबतं, 6 ते 7 जागांवर अद्याप तिढा कायम,उद्या पुन्हा बैठकीचं आयोजनराहुल गांधींच्या जीभेला चटके द्या म्हणणाऱ्या खासदार अनिल बोंडेंविरोधात गुन्हा, काँग्रेसकडून उद्या राज्यव्यापी आंदोलनाची हाक
राहुल गांधींवर हल्ल्याचा कट, संजय राऊतांचा गंभीर आरोप, गृहमंत्र्यांवरही व्यक्त केला संशय, तर केंद्र सरकार संरक्षण करण्यास सक्षम, बावनकुळेंचं प्रत्युत्तर
मनसे कार्यकर्ता जय मालोकार यांचा मृत्यू हृदयविकारानं नाही तर जबर मारहाणीमुळे, पोस्ट मॉर्टम अहवालात उघड, अमोल मिटकरींच्या कार तोडफोड प्रकरणामुळे चर्चेतमागण्या मान्य न केल्यास राजकीय करिअर उद्धवस्त करेन, दोन दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या जरांगेंचा इशारा, तर जरांगेंच्या विरोधात ओबीसींच्या वतीनं अंतरवालीतच मंगेश ससाणेंचं उपोषण
नवाब मलिकांचा जावई समीर खान यांचा भीषण अपघात, ड्रायव्हरनं ब्रेकच्या ऐवजी अॅक्लिलरेटर दाबल्यानं कार समीर यांना घेऊन भिंतीवर धडकली
भिवंडीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही वाहनांची तोडफोड, ईद-ए-मिलादच्या जुलूसदरम्यान काही तरुणांनी घोषणाबाजी केल्यानं वाहनं फोडली