Maharashtra Student Protest : राज्याचा गुप्तचर विभाग सपशेल अपयशी ठरतोय का?

Continues below advertisement

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या हिंदुस्थानी भाऊ ऊर्फ विकास फाटकच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळं राज्यभरातील दहावी-बारावीचे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. दहावी आणि बारावी या दोन्ही बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात या मागणीसाठी मुंबई, नागपूर, औरंगाबाद, पुण्यात शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. नागपुरात या आंदोलनाला  हिंसक वळण लागत विद्यार्थ्यांनी दोन बसेस फोडण्यात आल्या.  हे नियोजन करुन आंदोलन करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. तसंच हिंदुस्थानी भाऊच्या इन्स्टाग्राम, फेसबुक अकाऊंटवरील त्याचे काही व्हिडिओ समोर आले आहेत.  विद्यार्थ्यांना भडकावण्यात आले आहे. तसेच, हिंदुस्थानी भाऊ विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram