Maharashtra HSC Result 2021 : मूल्यमापन पद्धतीनं आज राज्य मंडळाच्या बारावीचा निकाल जाहीर होणार

Continues below advertisement

Maharashtra HSC Result 2021 Date Time : काही दिवसांपूर्वी बोर्डाकडून दहावीचा (SSC)चा निकाल जाहीर करण्यात आला होता. तेव्हापासूनच बारावीचा निकाल कधी लागणार? याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे. आता पालक आणि विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे यामुळे दहावी प्रमाणेच बारावीच्या निकालालाही यंदा जवळपास एक-दीड महिना उशीरा झाला आहे. आज दुपारी 4 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.  

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदा राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुण देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. यासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे निकषही ठरवले होते. अशातच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील बारावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. दहावीप्रमाणेच बारावीच्या विद्यार्थ्यांनाही अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारेच आज बारावीचा निकाल दुपारी 4 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर होणार आहे. 

बोर्डाच्या खालील अधिकृत संकेसस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाबाबत माहिती दिली. यावर्षी पहिल्यांदाच बारावी बोर्ड परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आला होता. त्यामुळे हा निकाल पूर्णपणे अंतर्गत मूल्यपामनद्वारे तयार करण्यात आला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram