दहावीतील खासगी विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी शेवटच्या परीक्षेचे गुण ग्राह्य धरणार
दहावीच्या परीक्षेला बसलेल्या खासगी विद्यार्थ्यांचे शेवटच्या परीक्षेचे गुण मूल्यमापनासाठी ग्राह्य धरणार आहेत. पाचवी ते नववी यापैकी विद्यार्थ्याने दिलेल्या शेवटच्या परीक्षेचा निकाल जमा करण्याच्या सूचना राज्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शाळांना दिल्या आहेत.