Soybean Crisis: 'सरकारचं नेमकं चाललंय का?', हमीभाव खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकरी संतप्त
Continues below advertisement
राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी कमी बाजारभाव आणि शासनाच्या खरेदी केंद्राअभावी मोठ्या संकटात सापडला आहे. खासगी व्यापारी खराब झालेल्या सोयाबीनला प्रति क्विंटल केवळ २००० ते ४००० रुपये भाव देत आहेत. 'म्हणजे ह्या सरकारचं नेमकं चाललंय का?', असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. १६ ऑक्टोबर उजाडला तरी शासनाचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट होत आहे. राज्यात जवळपास साडेतीनशे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खरेदी किंवा नोंदणी सुरू झालेली नाही. रब्बीच्या पेरणीचे नियोजन तोंडावर असताना हातात पैसा नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, शासनाने त्वरित हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावी, अशी एकमुखी मागणी जोर धरत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement