Solapur Unlock : उद्यापासून सोलापूर शहरातील निर्बंधांमध्ये शिथिलता ABP Majha
सोलापूर शहरातील नागरिकांना अखेर प्रशासनानं दिलासा दिलाय. १५ ऑगस्ट म्हणजे उद्यापासून सोलापुरातील निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आलीय. सर्व दुकानं, जिम, योगा सेंटर, सलून-स्पा सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत परवानगी देण्यात आलीय. तर, हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारही सर्व दिवस ५० टक्के क्षमतेनं खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. विवाह सोहळा खुल्या जागेत किंवा लॉनमध्ये असल्यास २०० जण तर बंदीस्त सभागृहात असल्यास १०० जणांच्या उपस्थितीला परवानगी आहे. मात्र, पुढील आदेशापर्यंत सोलापूर शहरातील धार्मिक स्थळं, मंदिरं, नाट्यगृहं, सिनेमागृहं बंदच राहणार आहेत.