Harshawardhan Sapkal : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर पोलिसांची पाळत? सरकारवर गंभीर आरोप

Continues below advertisement
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याच्या आरोपांमुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. 'देवेंद्र फडणवीस जी, आपण सांगितलं का, की देवेंद्र भारती (Deven Bharati) स्वतःच्या मनाने करतायत?' असा थेट सवाल काँग्रेसने केला आहे. सपकाळ राहत असलेल्या मुंबईतील सर्वोदय आश्रमात (Sarvoday Ashram) साध्या वेशातील पोलीस कर्मचारी येऊन चौकशी करत असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. यापूर्वी नाना पटोले यांनीही फोन टॅपिंगचे आरोप केले होते, जे सरकारने फेटाळले होते. भाजपने हे आरोप धुडकावून लावले असून, 'आमच्याकडे विकासाची कामे सोडायला वेळ नाही, पाळत ठेवण्याचा धंदा आमचा नाही,' असे प्रत्युत्तर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola