Voter List Row: मतदार यादीतील गोंधळावर आयोगाचं थेट उत्तर
Continues below advertisement
राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) मतदार यादीतील गोंधळ, दुबार मतदार (Duplicate Voters) आणि जात वैधता प्रमाणपत्रावर (Caste Validity Certificate) आपली भूमिका स्पष्ट केली. 'आम्ही फक्त भारत निवडणूक आयोगाकडून (ECI) आलेली यादी अडॉप्ट करतो,' असं म्हणत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मतदार यादीतील त्रुटींची जबाबदारी झटकली आहे. निवडून आल्यानंतर सहा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास निवडणूक रद्द होईल, असा नियमही त्यांनी स्पष्ट केला. आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना आयोग दुबार मतदारांना 'डबल स्टार' (Double Star) देऊन चिन्हांकित करणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, एका घरात ७२ मतदार असण्यासारख्या गंभीर चुकांना जबाबदार कोण, यावर आयोगाने थेट उत्तर देणे टाळले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement