Maharashtra Civic Polls: आज दुपारी राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, नेत्यांच्या प्रतिक्रिया
Continues below advertisement
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल आज वाजण्याची दाट शक्यता आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे (Dinesh Waghmare) आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेऊन जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिकांच्या तारखांची घोषणा करू शकतात. 'यावर काहीही न बोलता तडका फडकी अचानक निवडणूक आयोगाने समोर येणं आणि आम्ही आता आचारसंहिता जाहीर करत आहोत म्हणणं मला वाटतं हे वास्तवापासून पळ काढणं आहे, सत्यापासून तोंड लपविणं आहे', असा थेट आरोप एका विरोधी पक्ष नेत्याने सदोष मतदार याद्यांवरून केला आहे. बुलढाण्यातील (Buldhana) एकाच कुटुंबात शेख, कांबळे, जैन अशी नावं आढळल्याने मतदार याद्यांमधील गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाने (BJP) निवडणुका कधीही लागल्या तरी आम्ही तयार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) प्रलंबित निवडणुका लवकर घ्याव्यात अशी मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही (Supreme Court) जानेवारीपूर्वी निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement