Maharashtra Schools : राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक, शाळांबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष

Continues below advertisement

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक होतेय आणि त्यात निर्णय घेताना ठाकरे सरकारची दुहेरी कसोटी लागणार आहे. सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागानं दिलाय. कोरोनाची तिसरी लाट असतानाही शाळा सुरु करण्यासाठी सरकारवर शिक्षक आणि पालकांचा दबाव आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलंय. दुसरीकडे ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं काहीसा दिलासा मिळाला असला, तरी राज्य मागासवर्ग आयोगाकडे डेटा सोपवून त्यावर आयोगाचा अभिप्राय मिळवणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर चर्चा होऊ शकते. पुढच्या निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षण मिळवून देण्यात राज्य सरकारची कसोटी लागली आहे. त्यामुळे एकीकडे गोखले इन्स्टिट्यूटचा अहवाल स्वीकारण्यास राज्य मागासवर्ग आयोगानं नकार दिल्यास सरकारची अडचण होऊ शकते. त्यामुळे याबाबत निर्णय घेताना सरकारची कसोटी लागणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram