Maharashtra School Reopens : त्या बैठकीत झालेल्या निर्णयाशी मतभेद नाही : वर्षा गायकवाड
१७ तारखेपासून सुरु होणाऱ्या शाळांचा निर्णय तूर्तास लांबणीवर टाकण्यात आलाय. कारण राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे य़ांच्या उपस्थितीत काल उशीरा रात्री टास्क फोर्स अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत तज्ज्ञांनी तसा सल्ला दिलाय. लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढतोय. त्यात लहान मुलांसाठी औषधही उपलब्ध नसल्यानं शाळा सुरु करु नयेत, असा सल्ला तज्ज्ञांचा आहे. दरम्यान शाळा सुरु करण्यासंदर्भातला अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत.. दरम्यान निर्णय प्रकियेमध्ये महाविकास आघाडीत समन्वय नसल्याचं पुन्हा अधोरेखित झालंय... कारण १७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला होता. आणि काल रातोरात त्याला ब्रेक लागलाय. कोविड टास्क फोर्सच्या बैठकीबाबत माहिती नाही, पण त्या बैठकीत झालेल्या निर्णयाशी मतभेद नाही, अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.