Pothole Death : राज्यभरातील रस्त्यांवर मृत्यूचे खड्डे, 6 महिन्यांत तब्बल 8 हजार 68 बळी ABP Majha

राज्यभरात रस्त्यावरचे खड्डे म्हणजे मृत्यूचे सापळे बनलेत आणि या खड्ड्यांनी गेल्या सहा महिन्यांत तब्बल 8 हजारांवर लोकांचा बळी घेतलाय.... याचा अर्थ असा की राज्यात रोज सरासरी 44 जणांचा बळी घेतलाय.... जानेवारी ते जून या काळात राज्यात तब्बल 17 हजार 225 अपघात झालेत.... आणि त्यात हजारो लोकांचा हकनाक बळी गेलाय...... रस्त्यावरच्या खड्ड्यांचा मुद्दा वेळोवेळी चर्चेत येतो. त्यावर उपाययोजना करण्याच्या घोषणा होतात आणि खड्डेमुक्त रस्त्यांच्या घोषणा नंतर हवेत विरतात..... मग प्रश्न पडतो हजारो निष्पाप लोकांचे मारेकरी कोण? गेल्या सहा महिन्याल्या आकडेवारीनं रस्त्यांवरच्या खड्ड्यामुळे झालेल्या मृत्यूंचा प्रश्न पुन्हा चर्चेत आलाय.....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola