Palghar, Washim, Manmad: अवकाळी पावसाची हजेरी ABP Majha
हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसानं झोडपलं. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील येवला, मनमाड परिसरात जोरदार सरी बरसल्या. पावसामुळे कांदा लागवडीर परिणाम होणार आहे तर ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर रोगाचा प्रादुर्भावही वाढलेला दिसतोय. त्यामुळे कांदा खराब होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. वाशिमही अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. रात्री ९ पासून बरसलेल्या कारंजा तालुक्यातील दीड तासांच्या पावसानं गहू पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना फायदा झाला असला तरी तूर, हरभरा उत्पादकांना मात्र नुकसानाची भीती आहे.