Raigad Rains : रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार,नद्यांच्या पाणीपातळीत वाढ
रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. आजही हवामान विभागानं रायगडला रेड अलर्ट दिलाय. त्यामुळे आजही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झालीय. पावसाचा जोर कायम राहिल्यास आजही नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाटमाथ्यावर प्रवास करताना सतर्कता बाळगण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय.