Maharashtra Rains | Nandurbar मध्ये Omni गाडी वाहून गेली, Video Viral
बुलडाणा येथून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यभरात विविध ठिकाणी पाऊस कोसळत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अलमाड ते धानोरा रस्त्यावर एका छोट्या नाल्यातून एक चारचाकी मालवाहू Omni गाडी वाहून गेल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. गाडीच्या चालकाने गाडीची काच तोडून स्वतःचा जीव वाचवला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक ठिकाणी पावसाने कहर केल्याचे चित्र आहे. सलमान या संदर्भात अधिक माहिती देत आहे.