Kolhapur : कोल्हापुरात संततधार; यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर

कोल्हापूर शहरात पावसाची संततधार सुरूच आहे. शहरात पावसाचा जोर कमी असला तरी ग्रामीण भागात मात्र जोरदार पाऊस कोसळतोय. त्यामुळे यंदा दुसऱ्यांदा पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलंय. पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या २८ फूट १० इंचांवर पोहोचली आहे. संततधार पावसानं जिल्ह्यातले १७ बंधारे सध्या पाण्याखाली आहेत. पाऊस थांबला नाही तर पंचगंगेची पाणी पातळी अधिक वाढण्याचा धोकाही संभवतोय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola