Maharashtra Rain Update : राज्याच्या काही भागात पुढील दोन-तीन दिवस पावसाचा अंदाज
राज्याच्या काही भागात पुढच्या दिवसांत पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात पुढचे तीन-चार दिवस पावसाचं सावट आहे. दक्षिण कोकणातल्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असा इशारा देण्यात आला आहे. कोकणातल्या काही भागात कालही पावसानं हजेरी लावली होती.