Diwali 2021 : गोविंदबागेत दिवाळीचा मेळा, पवार कुटुंबियाच्या भेटीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते बारामतीत

Continues below advertisement

दिवाळीचा सण सर्वत्र उत्साहाने साजरा केला जात आहे. दिवाळीच्या सणात बारामतीत देखील वेगळा उत्साह असतो. पवार कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी बारामतीत कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले आहेत.  स्वतः शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार या शुभेच्छा स्वीकारत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळी पाडव्याला बारामतीत राज्यातील कानाकोपऱ्यातून नेते, कार्यकर्ते न चुकता येतात. गेल्या वर्षी कोरोनामुळं यात खंड पडला होता. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने यंदा पुन्हा एकदा पवार कुटुंबीय कार्यकर्त्यांसोबत पाडवा साजरा करत आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram