Maharashtra Rain Update : कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात 3 ते 4 दिवस जोरदार पावसाचा अंदाज
Continues below advertisement
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने राज्यात पुढील 3 ते 4 दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यताही वर्तवण्यात आलीय. मुंबई, ठाण्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा असून नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज. विदर्भातही आज अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणीसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदूरबारमध्ये विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
Continues below advertisement